दिनांक 6/11/2023 रोजी दुसरी बैठक दादर जी उत्तर महानगरपालिका ठिकाणी
6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांची व्यवस्था आणि सोयी सुविधा अत्यंत चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी स्थानिक पातळीवरती सहाय्यक आयुक्त मान. प्रशांत सपकाळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच भंते बि. संघपाल , भिकाजी कांबळे, प्रदीप कांबळे , प्रतीक कांबळे, प्रसन्नजीत कांबळे, मनोज
गायकवाड, आशिष गाडे, रवी गरुड, कामगार नेते रमेश मा.जाधव , विलासभाऊ रूपवते व समता सैनिक दलाच्या अनेक प्रमुखांच्या उपस्थितीत आजची बैठक संपन्न झाली. *या बैठकीत प्रामुख्याने मंत्रालयात होणारी बैठक या बैठकीला चैत्यभूमी ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा व बौद्धजन पंचायत समिती तसेच व्यवस्थापकांना का डावल जाते व मुंबई महापालिका सर्व खर्च करत असताना मंत्रालयातून निधी का मिळत नाही. मग मंत्रालयात मिटींग घेऊन कोणाला प्रसिद्धी द्यायची असते. हा रोश कार्यकर्त्यांमध्ये होता.*