डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या दोषांवरून भीमसैनिक विलास रुपवते यांचा आत्मदहनाचा इशारा

BhimSainik Vilas Rupwate protests defects in Ambedkar's statue; police intervene to prevent tragedy.

Mar 6, 2025 - 12:42
Mar 6, 2025 - 12:44
 0  132

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या दोषांवरुन संघर्ष समितीची बैठक; आंदोलन स्थगित

मुंबई: इंदू मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यातील दोषांवर आक्षेप घेतला असून, या संदर्भात संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

भीमसैनिक आणि शिवसैनिक विलास रुपवते यांनी यासंदर्भात 100 माळ्यावरून उडी मारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांना संविधान निवास पोलिसांनी रोखले आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी घेऊन गेले. या अनुषंगाने दिनांक 5 मार्च 2025 रोजी माहीम येथे डीसीपी झोन 5 चे अधिकारी गणेश गावडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यातील दोषांवर चर्चा झाली. डीसीपी श्री गणेश गावडे यांनी संबंधित मंत्री, सचिव आणि मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाच्या आधारे संघर्ष समितीने दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जर बैठक झाली नाही, तर निश्चितच आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.

या बैठकीस शिवसेना संघटक विलास रुपवते, कामगार नेते रमेश जाधव, समाजसेवक प्रतीक कांबळे, भीम आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कांबळे, रमेश संकटे, रमेश बोलेस आणि जाहीद शेख आदी नेते उपस्थित होते.


English News Article:

Protest Committee Holds Meeting Over Dr. Ambedkar's Statue Defects; Agitation Temporarily Suspended

Mumbai: The Indu Mill Dr. Babasaheb Ambedkar International Memorial Struggle Committee has raised objections regarding defects in Dr. Babasaheb Ambedkar's statue. The committee had warned of a major protest regarding this issue.

Bhim Sainik and Shiv Sainik Vilas Rupawate had even declared their intent to jump from the 100th floor in protest. However, the police at Samvidhan Nivas intervened and took him to meet senior officials for discussions. Following this, a meeting was held on March 5, 2025, at Mahim, in the presence of DCP Zone 5 Officer Ganesh Gawde.

During the meeting, discussions were held regarding the defects in Dr. Ambedkar's statue. DCP Ganesh Gawde assured that he would arrange a meeting with the concerned Ministers, Secretaries, and the Chief Minister. Based on this assurance, the protest has been temporarily suspended for two days. However, if the meeting does not take place, the agitation will certainly be carried out, the committee warned.

The meeting was attended by Shiv Sena Organizer Vilas Rupawate, Labor Leader Ramesh Jadhav, Social Worker Pratik Kamble, Bhim Army National President Ashok Kamble, Ramesh Sankate, Ramesh Boles, and Zahid Shaikh.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow