पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची शोधमोहीम

Controversy at CBFC as Vilas Rupawate demands apology for remarks on Padma Shri Namdev Dhasal.

Mar 3, 2025 - 19:24
Mar 4, 2025 - 12:05
 0  145

केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्डात वाद – पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची शोधमोहीम

मुंबई, ३ मार्च २०२५ – केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्डाच्या कार्यालयात आज मोठा वाद निर्माण झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे संघटक विलास रुपवते, भीमसैनिक आणि शिवसैनिकांनी या कार्यालयात धडक मारली. त्यांचे उद्दिष्ट होते – त्या अधिकाऱ्याला शोधणे, ज्याने दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांना ओळखत नसल्याचे वक्तव्य केले होते.

विलास रुपवते यांनी संबंधित अधिकाऱ्याला भेटण्यासाठी कार्यालयात प्रवेश केला. मात्र, तो अधिकारी अनुपस्थित असल्याने इतर अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी लेखी पत्र सुपूर्त केले. या पत्रात त्यांनी मागणी केली की, दिवंगत नामदेव ढसाळ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्याने त्वरित लेखी माफी मागावी. अन्यथा, शिवसेनेच्या आणि विलास रुपवते यांच्या शैलीत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.

यामुळे महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी गोविंद मिश्राजी यांनी तातडीने विलास रुपवते यांना फोन करून भेटण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विलास रुपवते आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांच्या उपस्थितीत केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्डाच्या कार्यालयाबाहेर माघार घेतली.


News in English

Controversy at the Central Film Certification Board – Officer Who Made Remarks on Padma Shri Namdev Dhasal Under Scrutiny

Mumbai, March 3, 2025 – A major controversy erupted today at the Central Film Certification Board office as Vilas Rupawate, organizer of the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray faction), along with Bhim Sainiks and Shiv Sainiks, stormed into the office. Their objective was to confront the officer who allegedly stated that he did not recognize the late Padma Shri Namdev Dhasal.

Vilas Rupawate entered the office with the intent to meet the concerned officer. However, as the officer was not present, he met other officials and submitted a formal letter. The letter demanded a written apology from the officer who made the controversial statement about the late Namdev Dhasal. He warned that if the demand was not met promptly, a strong protest would be launched in the signature style of Shiv Sena and Vilas Rupawate.

Following the incident, Maharashtra’s senior administrative officer, Govind Mishraji, called Vilas Rupawate and assured a meeting to resolve the matter. Subsequently, Vilas Rupawate and his supporters withdrew from the Central Film Certification Board office under police supervision.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow