सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठेपणा

A tribute to Uddhav Thackeray's leadership in 2009, his support for Vilas Rupvate, and their resilience and loyalty within Shiv Sena.

Jul 22, 2024 - 14:35
 0  79
सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठेपणा
The Greatness of Honorable Uddhav Balasaheb Thackeray

सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठेपणा

2009 साली शिवसेना भवन येथे एक ऐतिहासिक बैठक झाली, ज्यामध्ये सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी विलास रुपवते आणि लताताई सकट यांना स्वतः बोलून घेतले. या बैठकीच्या वेळी शिवसेना नेते श्री विनायक राऊत साहेब उपस्थित होते. उद्धव साहेबांनी विलास रुपवते यांना मोठ्या आदराने संबोधित करताना म्हटले, "विलास भाऊ, तुमचे काम खूप मोठे आहे. तुम्हाला लोकसभेची जागा कुठून पाहिजे ते सांगा. मला तुम्हाला खासदार बनवायचे आहे. दिल्लीच्या संसदेत दुर्बल, सोशीत, पिढीत, वंचितांचा आवाज पाठवायचा आहे."

विलास रुपवते आणि लताताई सकट यांनी उद्धव साहेबांचे आभार मानले. परंतु, या बैठकीच्या पाच दिवसांनंतर, विलास रुपवते आणि लताताई सकट यांचा मोठा शहापूर येथे अपघात झाला. ड्रायव्हरने चालू गाडीमधून उडी मारली आणि काही लोकांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या अपघातात विलास रुपवते कित्येक महिने हॉस्पिटलमध्ये होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 2009 मध्ये विलास रुपवते यांना एक मोठी राजकीय संधी दिली होती. परंतु, विलास रुपवते यांनी उद्धव साहेबांकडे काही मागितले नाही. त्यांना शिवसेना आणि उद्धव ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा होती. 2024 लोकसभा निवडणुकीत, विलास रुपवते यांनी दाखवून दिले आहे की ते सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे विश्वासू अनुयायी आहेत आणि शिवसेनेचे हात मजबूत करण्यासाठी ते नेहमी तत्पर आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा हा मोठेपणा आणि त्यांचे नेतृत्व ही शिवसेनेची खऱ्या अर्थाने ताकद आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेने आणि नेतृत्वामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे आणि मिळत राहील.

The Greatness of Honorable Uddhav Balasaheb Thackeray

In 2009, a historic meeting took place at Shiv Sena Bhavan, where Honorable Uddhav Balasaheb Thackeray personally called upon Vilas Rupvate and Lata Tai Sakat. Shiv Sena leader Shri Vinayak Raut was also present during this meeting. Uddhav Saheb, addressing Vilas Rupvate with great respect, said, "Vilas Bhau, your work is significant. Tell me from where you want a Lok Sabha seat. I want to make you a Member of Parliament. I want to send the voice of the weak, oppressed, downtrodden, and deprived to the Parliament in Delhi."

Vilas Rupvate and Lata Tai Sakat expressed their gratitude towards Uddhav Saheb. However, five days after this meeting, Vilas Rupvate and Lata Tai Sakat met with a major accident at Motha Shahapur. The driver jumped out of the moving car, and some people attempted to kill them. Due to this accident, Vilas Rupvate spent several months in the hospital.

In 2009, Uddhav Balasaheb Thackeray had given Vilas Rupvate a significant political opportunity. Despite this, Vilas Rupvate never asked Uddhav Saheb for anything. Instead, he joined Shiv Sena solely to strengthen the hands of Uddhav Thackeray Saheb and the Shiv Sena. In the 2024 Lok Sabha elections, Vilas Rupvate has demonstrated his unwavering loyalty to Honorable Uddhav Thackeray Saheb and his commitment to strengthening the Shiv Sena.

The greatness of Uddhav Balasaheb Thackeray and his leadership is the true strength of Shiv Sena. His decisiveness and leadership have inspired many and will continue to do so.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow